बातम्या
विद्या मंदिर तळवडे येथे शिवजयंती व विद्यार्थ्यांचा खाद्य महोत्सव उत्साहात संपन्न..
By nisha patil - 2/19/2025 7:22:53 PM
Share This News:
विद्या मंदिर तळवडे येथे शिवजयंती व विद्यार्थ्यांचा खाद्य महोत्सव उत्साहात संपन्न..
शिवजयंती सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न...
आज दिनांक 19 फेब्रुवारी विद्या मंदिर तळवडे येथे शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले तसेच दरवर्षीप्रमाणे याच दिवशी भरविण्यात येणारा लहान मुलांचा बाजार व खाद्य महोत्सव आयोजित करण्यात आला होता.
.%5B5%5D.jpg)
लहान मुलांना खरेदी-विक्री , नफा तोटा तसेच मालाची जाहिरात कशी करावी या गोष्टी समजाव्यात या उद्देशाने विद्या मंदिर तळवडे येथे मुख्याध्यापिका भारती पाटील व सौ.रेडीज मॅडम यांच्या नियोजनाने शाळेच्या पटांगणात लहान मुलांकडून बाजार भरविला जातो, यामध्ये ग्रामस्थ , शाळेतील सर्व विद्यार्थी, विद्यार्थ्यांचे पालक असे सर्वजण सहभाग घेतात. लहान मुले विविध पदार्थ बनवून विक्रीसाठी ठेवतात व सर्वजण याचा आस्वाद घेतात. आजच्या बाजारामध्ये स्पेशल भेळ , कोबी मंचुरियन इडली सांबार, पाणीपुरी, गुलाब जामून असे विविध पदार्थ पहावयास मिळाले. उपस्थित विद्यार्थी, पालकांनी प्रत्येक स्टॉलला भरभरून प्रतिसाद दिला.
.%5B5%5D.jpg)
कार्यक्रमामध्ये सर्व विद्यार्थी , उत्साही व आनंदी दिसून आले. शिवजयंतीचा कार्यक्रम सुद्धा अतिशय भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी पत्रकार उज्वला लाड , पोलीस पाटील गणेश शेलार , शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सुनील घावरे , विजय सरावणे , दीपक कोलते , वाय के पाटील सर ,माने सर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
विद्या मंदिर तळवडे येथे शिवजयंती व विद्यार्थ्यांचा खाद्य महोत्सव उत्साहात संपन्न..
|