राजकीय
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी..
By nisha patil - 2/19/2025 7:36:06 PM
Share This News:
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी..
शिवसेना शहर समन्वयक विशाल देवकुळे यांचं आयोजन.
आज देशभरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येतीय.कोल्हापुरातील शिवजयंतीचा अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळाला.
शिवसेना शहर समन्वयक विशाल देवकुळे व महेश उत्तुरे यांच्या माध्यमातून राजारामपुरी माळी कॉलनी येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवाचा आयोजन करण्यात आलं. दुपारी शिवसेनेच्या महिला पदाधिकारी व महिलांनी छत्रपती शिवरायांच्या शिवजन्मोत्सव काळ साजरा केला. यावेळी शहर संघटिका प्रतिज्ञा उत्तरे, जाहिदा खान, रीमा देशपांडे यांच्यासह महिलांनी पारंपारिक पाळणा गायला.त्यांनंतर शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, सह संपर्कप्रमुख विजय देवणे, शहर प्रमुख रवी किरण इंगवले सुनील मोदी, भाजपचे अध्यक्ष विजय जाधव,यांच्यासह ठाकरे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते व विविध पक्षाचे मान्यवर प्रभागातील नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाप्रसंगी महसूल सहाय्यक पदी निवड झाल्याबद्दल वासंती जाधव हिचा सत्कार करण्यात आला.
जयंती सोहळ्यानिमित्त महाप्रसादाचे हे आयोजन करण्यात आले होते. याला परिसरातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी..
|