बातम्या

शहरात ‘शिवकार्य’ उपक्रमाची सुरुवात...

Shivkarya activity started in the city


By nisha patil - 6/2/2025 7:19:09 PM
Share This News:



कोल्हापूर शहरात शिवसेनेच्या वतीने "शिवकार्य" उपक्रमाची सुरुवात आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आली. या उपक्रमांतर्गत शहराच्या प्रवेशद्वारांवर स्वागत फलक लावण्यात आले असून, २२ शाखांचे उद्घाटन आणि ५ संपर्क कार्यालये सुरू करण्यात येणार आहेत.

यामुळे आगामी निवडणुकांसाठी संघटनात्मक बांधणीला बळ मिळणार आहे.आमदार राजेश क्षीरसागर यांनी सांगितले की, शिवसेनेचा संघर्षशील वारसा कायम राखत पक्षाच्या बांधणीसाठी हा उपक्रम हाती घेतला आहे. मुंबई, ठाण्यानंतर कोल्हापूर शिवसेनेचा बालेकिल्ला असून, पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी शहरभर ‘शिवकार्य’ मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे.


शहरात ‘शिवकार्य’ उपक्रमाची सुरुवात...
Total Views: 43