बातम्या

शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मेळावा दसरा चौकात

Shivsena


By nisha patil - 8/10/2024 11:45:02 PM
Share This News:



मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या अडीच वर्षात कोट्यावधी रुपयांचा निधी कोल्हापूर शहरास दिला आहे. यामुळे शहरातील प्रमुख प्रलंबित प्रश्न मार्गी लागले असून, या विकासाकामांचा उद्घाटन सोहळा उद्या दि.०९ रोजी सायंकाळी ६.०० वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दसरा चौक मैदान येथे पार पडणार आहे. यामध्ये प्रामुख्याने कोल्हापूर सांगली जिल्हा पूरनियंत्रण करणे, आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर उभारणे., अमृत २.० योजना पहिला टप्पा, अमृत २.० योजना दुसरा टप्पा, संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह पुनर्बांधणी व संवर्धन करणे, कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोयी सुविधा पुरविणे, पंचगंगा नदी घाट सुशोभिकरण करणे, पंचगंगा नदी घाट येथे विविध विकासकामे करणे, गांधी मैदान येथे स्ट्रॉम वॉटर ड्रेनेज लाईन टाकणे, कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील विविध भागांमध्ये रस्ते डांबरीकरण करणे, शहरात ठिकठिकाणी हेरीटेज लाईट बसविणे, रंकाळा तलाव येथे म्युजीकल फौंऊटेन उभारणे, रंकाळा तलाव येथे आकर्षक विद्युत रोषणाई करणे, रंकाळा तलाव येथे मिनिचर पार्क तयार करणे, पंचगंगा स्मशानभूमी दुरुस्ती व नुतनीकरण करणे, सिद्धार्थनगर येथे पूरसरंक्षक भिंत बांधणे, श्री अंबाबाई महालक्ष्मी मंदिर परिसराअंतर्गत म्युझिकल हेरीटेज स्ट्रीट लाईट बसविणे, छत्रपती शिवाजी स्टेडियमचे सपाटीकरण करणे, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे विरंगुळा उद्यान तयार करणे.

 

को.म.न.पा.प्र.क्र.३१ बाजारगेट अंतर्गत श्री निरंजन संस्था तालीम मठ येथे धर्मवीर आनंद दिघे कुस्ती संकुल विकसित करणे, कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील विविध गार्डनमध्ये बैठक व्यवस्था (बेंचेस) बसविणे, कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील विविध प्रभागांमध्ये ओपन जिम व उद्यानामध्ये व्यायामाचे साहित्य बसविणे, कोल्हापूर शहरात ओला, सुका, घरगुती घातक कचरा आणि सॅनिटरी कचरा वर्गीकरणासाठी ठिकठिकाणी वेट आणि ड्राय गारबेज कलेक्टर बसविणे, को.म.न.पा.प्र.क्र.१ शुगरमिल अंतर्गत कसबा बावडा येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक विकसित करणे, को.म.न.पा.प्र.क्र.५६ मधील म.न.पा.चे रि.स.नं.४६२ येथील (ओपन स्पेस) संभाजीनगर येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उद्यान विकसित करणे, शाहू उद्यान विकसित व सुशोभिकरण करणे, कसबा बावडा येथील हनुमान तलावाचे संवर्धन व सुशोभिकरण करणे अशा एकूण रु.४५०० कोटींच्या कामांचा शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहिती .राजेश क्षीरसागर यांनी दिली.


शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मेळावा दसरा चौकात