बातम्या
प्राध्यापिकेने विद्यार्थ्याशी लग्न केल्याचा धक्कादायक प्रकार!
By nisha patil - 1/30/2025 7:39:46 PM
Share This News:
प्राध्यापिकेने विद्यार्थ्याशी लग्न केल्याचा धक्कादायक प्रकार!
घटनेने एकच खळबळ.. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यातील हरिघाटा येथील मौलाना अबुल कलाम आझाद तंत्रज्ञान विद्यापीठातील मानसशास्त्र विभागात एक धक्कादायक प्रकार घडला. एका प्राध्यापिकेने विद्यार्थ्याशी लग्न केल्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. विद्यार्थ्याने पहिल्या वर्षातच शिकवणी घेत होती, आणि प्राध्यापक-विद्यार्थी एकमेकांच्या गळ्यात फुलांचे हार घालताना व्हिडीओ दिसत आहेत.सध्या या घटनेबद्दल विद्यापीठ प्रशासनाने कारवाई केली आहे आणि संबंधित विभाग प्रमुखांना रजेवर पाठवले आहे. सोशल मीडियावर या घटनेची जोरदार चर्चा सुरू असून, हे खरे लग्न होते का, यावर साशंके व्यक्त केले जात आहेत.
प्राध्यापिकेने विद्यार्थ्याशी लग्न केल्याचा धक्कादायक प्रकार!
|