मनोरंजन
श्रद्धा कपूरची नवी लक्झरी कार चर्चेत!
By nisha patil - 3/29/2025 5:19:35 PM
Share This News:
श्रद्धा कपूरची नवी लक्झरी कार चर्चेत!
बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरने तिच्या लक्झरी कार कलेक्शनमध्ये Lexus LM 350h ही नवी कार समाविष्ट केली आहे. अलीकडेच ती ही शानदार कार चालवताना दिसली, आणि तिचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले आहेत.
ही गाडी कोटींच्या घरात किंमत असलेली लक्झरी एमपीव्ही आहे, जी हायब्रिड इंजिन आणि अत्याधुनिक फीचर्ससह येते. तिच्या काळ्या रंगाच्या कारची झलक पाहून चाहत्यांनी तिला अभिनंदनाचा वर्षाव केला.
श्रद्धा कपूर तिच्या गाड्यांसाठी प्रसिद्ध असून, तिच्या कलेक्शनमध्ये आधीपासूनच Mercedes, Audi आणि BMW सारख्या लक्झरी कार्स आहेत. आता Lexus LM 350h समाविष्ट झाल्याने तिच्या कलेक्शनमध्ये आणखी एक दिमाखदार भर पडली आहे.
श्रद्धा कपूरची नवी लक्झरी कार चर्चेत!
|