बातम्या

आज श्रीराम मंदिर वर्षपूर्ती

Shri Ram Mandir Anniversary today


By nisha patil - 1/22/2025 11:14:25 AM
Share This News:



आज श्रीराम मंदिर वर्षपूर्ती 

22 जानेवारी 2024 रोजी श्रीराम मंदिर सर्वांसाठी खुले झाले, आणि त्यानंतर जगभरातील लाखो भाविकांनी राम लल्लाचे दर्शन घेतले. एक वर्षात सराaसरी एक लाख भाविक रोज मंदिरात येत असल्याची माहिती आहे. 2025 मध्ये 11 जानेवारी रोजी राम लल्ला प्रतिष्ठापना झाली  श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राच्या वतीने सांगितले गेले आहे की मंदिर आणि परिसराचे संपूर्ण काम 2025 मध्ये पूर्ण होईल.

मंदिराच्या पहिल्या मजल्यावर प्रभू श्रीराम, माता सीता, लक्ष्मण, भरत, आणि शत्रुघ्न यांच्या मूर्त्या बसवण्यात येणार आहेत. प्रसिद्ध चित्रकार वासुदेव कामत यांचे यासाठी रचनात्मक योगदान असेल. 2024 च्या पहिल्या आठ महिन्यात अडीच कोटी भाविकांनी राम लल्लाचे दर्शन घेतले, आणि 2025 च्या पहिल्या दिवशी 10 लाख भाविक अयोध्येत दाखल झाले होते.


आज श्रीराम मंदिर वर्षपूर्ती
Total Views: 45