बातम्या
श्री संत रोहिदास महाराज जयंती संपन्न
By nisha patil - 12/2/2025 4:38:14 PM
Share This News:
श्री संत रोहिदास महाराज जयंती संपन्न
कोल्हापूर, : संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या वतीने जिल्हा कार्यालय कोल्हापूर येथे आज संत शिरोमणी श्री संत रोहिदास महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. अखिल महाराष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हा अध्यक्ष विठ्ठल नांगरे महाराज यांच्या हस्ते संत रोहिदास महाराजांच्या फोटोस पुष्पहार घालुन पूजन करण्यात आले.
यावेळी समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन साळे, जात पडताळणी विभागाचे सहायक आयुक्त उमेश घुले व इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण विकास विभागाचे अमित घवले, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एन.एम. पवार उपस्थित होते.
जिल्हा व्यवस्थापक एन.एम. पवार यांच्या मार्फत महामंडळाच्या विविध योजनांची माहिती उपस्थित समाज बाधवांना देण्यात आली. यावेळी नागेश शेजाळे राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे ग्रामीण जिल्हाअध्यक्ष, दिपक खांडेकर, जिल्हा अध्यक्ष राष्ट्रीय चर्मकार महासंघ कोल्हापूर, अजित अंकारे, विनायक कांबळे, पांडुरंग संकपाळ, आनंदा कमलाकर, तानाजी महाजन, उत्तम जाधव, दिपक यादव, गोकुळ कांबळे, नेताजी खंदारे व सर्व महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सर्व उपस्थितांचे जिल्हा व्यवस्थापक पवार यांच्या तर्फे आभार मानण्यात आले.
श्री संत रोहिदास महाराज जयंती संपन्न
|