ताज्या बातम्या

श्रीमंत हेमलताराजे गायकवाड यांचे निधन

Shrimant Hemaltaraj Gaikwad passed away


By nisha patil - 1/21/2025 7:34:06 PM
Share This News:



श्रीमंत हेमलताराजे गायकवाड यांचे निधन

कागल,प्रतिनिधी. बडोदा (गुजरात )येथील गायकवाड राजघराण्यातील श्रीमंत हेमलताराजे भूपेंद्रसिंह गायकवाड(वय ८६)यांचे निधन झाले.कागल संस्थानचे भुतपुर्व अधिपती श्रीमंत जयसिंगराव घाटगे  तथा बाळ महाराज यांच्या त्या ज्येष्ट कन्या तर शाहू साखर कारखान्याचे संस्थापक दिवंगत विक्रमसिंहराजे घाटगे व प्रवीणसिंहराजे घाटगे यांच्या त्या ज्येष्ट भगिनी होत.शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या त्या आत्या होत.

   त्यांचा विवाह कावलाना (बडोदा) येथील प्रतिभावान टेनिस व क्रिकेटपटू श्रीमंत भूपेंद्रसिंह शूरसिंहराव गायकवाड यांच्याशी झाला होता.त्यांना मुलगा शिवराज,मुलगी मधुवंती अशी दोन अपत्ये व चार नातवंडे आहेत.त्यापैकी दिव्यांशु गायकवाड हा गुजरातचे प्रतिनिधित्व करणारा राष्ट्रीय  फुटबॉलपटू आहे. 


श्रीमंत हेमलताराजे गायकवाड यांचे निधन
Total Views: 99