बातम्या
श्रीपतराव बोंद्रे दादा यांना जयंती दिनानिमित्त शाहू शिक्षण संस्थेत अभिवादन
By nisha patil - 12/29/2024 11:59:34 PM
Share This News:
श्रीपतराव बोंद्रे दादा यांना जयंती दिनानिमित्त शाहू शिक्षण संस्थेत अभिवादन
कोल्हापूर : महाराष्ट्राचे माजी कृषी राज्यमंत्री स्वर्गीय श्रीपतराव शंकराव बोंद्रे दादा यांना 104 व्या जयंती दिनानिमित्त आज दसरा चौक येथील श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेत अभिवादन करण्यात आले.श्रीपतराव बोंद्रे दादा यांच्या पुतळ्यास संस्थेचे चेअरमन मानसिंग विजयराव बोंद्रे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री राहुल पाटील, पंडितराव बोंद्रे, शिवाजी विद्यापीठाचे माजी बी सी यु डी संचालक डॉ. डी.आर.मोरे, शहाजी छत्रपती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.के.शानेदिवाण, शाहू फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. अतुल पाटकर, वेणूताई चव्हाण मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. श्री कागले सर, साई हायस्कूलचे प्राचार्य संजय पाटील, शाहू आयटीआयचे प्राचार्य वाघरे, श्रीपतराव बोंद्रे दादा इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या सौ. मोहिते ,इतर सर्व संस्थांचे प्रमुख, शिक्षक, प्राध्यापक, प्रशासकीय सहकारी व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. संस्थेचे अधीक्षक रुपेश खांडेकर विठ्ठल आमले, विष्णू चौगुले यांनी संयोजन केले. श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात दादा बापू जयंती महोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. तसेच शहाजी वार्ता अंकाचे प्रकाशन आणि महाविद्यालयाच्या अद्यावत वेबसाईटचे सादरीकरण यावेळी करण्यात आले जयंती महोत्सवानिमित्त घेतलेल्या विविध उपक्रमांचे व्हिडिओ चित्रीकरण यावेळी सादर करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर के शानेदिवाण, प्रबंधक रवींद्र भोसले, अधीक्षक मनीष भोसले, डॉ. आर. डी. मांडणीकर,डॉ डी एल काशीद पाटील, डॉ सरोज पाटील , यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले.
डॉ. पांडुरंग पाटील यांनी स्वागत केले. प्रा. पि के पाटील यांनी सूत्रसंचालन केले. डॉ डी के वळवी यांनी आभार मानले.
श्रीपतराव बोंद्रे दादा यांना जयंती दिनानिमित्त शाहू शिक्षण संस्थेत अभिवादन
|