बातम्या

बिग बॉसच्या घरात आता शुभंकर तावडेची एन्ट्री

Shubhankar Tawdes entry in Bigg Boss house now


By nisha patil - 7/24/2024 11:18:29 PM
Share This News:



बिग बॉस मराठीचा पाचवा सिझन येत्या 28 जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे या सिझनमध्ये कोणते कलाकार स्पर्धक म्हणून सहभागी होणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. त्यातच अनेक कलाकारांची नावं या यादीमध्ये समोर येतायत. पण हे कलाकार खरंच सहभागी होणार का? हे येत्या 28 जुलै रोजीच स्पष्ट होईल. यामध्ये आता अभिनेता शुभंकर तावडेचंही  नाव समोर आलं आहे. कलर्स मराठीने शेअर केलेल्या एका पोस्टमुळे शुभंकरच्या नवाची चर्चा रंगू लागली आहे. त्या सोशल मिडिया पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत शुभंकरच्या नाव पुढे केलं आहे. पण अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण आता प्रेक्षकांना अवघ्या काही दिवसांचीच प्रतीक्षा करावी लागणार आहे. शुभंकर हा काही महिन्यांपूर्वी आलेल्या वेड या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या पोस्टवर वेड लावलंय हे गाणंही लावण्यात आलं आहे. जे याच सिनेमातलं आहे. त्यामुळे शुभंकर आता बिग बॉसच्या घरात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.


बिग बॉसच्या घरात आता शुभंकर तावडेची एन्ट्री