राजकीय
श्याम लाखे यांचा रिपब्लिकन पक्षात प्रवेश...
By nisha patil - 11/3/2025 3:19:19 PM
Share This News:
श्याम लाखे यांचा रिपब्लिकन पक्षात प्रवेश...
कोल्हापूर जिल्ह्यात पक्ष बळकट होणार - सतीश माळगे
कोल्हाटी डोंबारी समाजाचे युवा नेतृत्व श्याम लाखे यांनी आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात प्रवेश केला. मुंबईतील बांद्रा येथील पक्ष कार्यालयात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार रामदासजी आठवले यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला.
पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोक (बापू) गायकवाड, जिल्हा सचिव सतीश माळगे आणि ज्येष्ठ नेते राजू भडंगे यांच्या मार्गदर्शनाखाली लाखे यांनी पक्ष प्रवेश केला.
रामदास आठवले साहेबांनी यावेळी श्याम लाखे यांना भटक्या जाती विमुक्त जमाती सेलची जबाबदारी सोपविण्याचे आश्वासन दिले. या प्रवेशामुळे कोल्हापूर जिल्ह्यात रिपब्लिकन पक्ष अधिक मजबूत होईल, अशी भावना सतीश माळगे यांनी व्यक्त केली.
श्याम लाखे यांचा रिपब्लिकन पक्षात प्रवेश...
|