बातम्या
कोल्हापूरची सिद्धी जाधव राष्ट्रीय हॉकी पंच म्हणून निवड
By nisha patil - 11/27/2024 4:11:09 PM
Share This News:
कोल्हापूरची सिद्धी जाधव राष्ट्रीय हॉकी पंच म्हणून निवड
सिकंदराबाद येथील आर.सी.सी. हॉकी ग्राउंडवर 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2024 या कालावधीत होणाऱ्या 14व्या सब-ज्युनिअर राष्ट्रीय महिला हॉकी स्पर्धेसाठी कोल्हापूरच्या सिद्धी संदीप जाधव हिला पंच म्हणून निवड करण्यात आली आहे. सिद्धी ही कोल्हापूर जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रातील एक उल्लेखनीय व्यक्तिमत्व असून तिची ही निवड कोल्हापूरसाठी अभिमानास्पद ठरली आहे.
सिद्धीला हॉकी महाराष्ट्रचे अध्यक्ष कृष्णप्रकाश, मनोज भोरे, मनीष आनंद यांचे मार्गदर्शन लाभले आहे. तसेच हॉकी कोल्हापूरच्या अध्यक्षा सुरेखा पाटील, सचिव मोहन भांडवले, व आंतरराष्ट्रीय पंच दिग्विजय नाईक यांचे प्रोत्साहन आणि सहकार्य यामुळे तिच्या यशाचा मार्ग सुकर झाला.
सिद्धीच्या निवडीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. तिच्या या यशाबद्दल तिला सर्व स्तरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत.
कोल्हापूरची सिद्धी जाधव राष्ट्रीय हॉकी पंच म्हणून निवड
|