बातम्या

कोल्हापूर उत्तर मधून उमेदवारी द्यावी ; ठाकरे गटाच्या स्मिता सावंत- मांडरे यांची मागणी

Smita sawant mandare


By nisha patil - 7/28/2024 1:36:59 PM
Share This News:



कोल्हापूर उत्तर मधून उमेदवारी द्यावी ; ठाकरे गटाच्या स्मिता सावंत- मांडरे यांची मागणी


कोल्हापूर: विधानसभेसाठी शिवसेना ठाकरे गटातच आता मोठी चुरस निर्माण झाली असून या पक्षातून ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार हे कोल्हापूर उत्तर मधून लढवण्यास तयार असताना ठाकरे गटाच्याच स्मिता सावंत मांडरे यांनी कोल्हापूर उत्तर मधून उमेदवारी द्यावी, अशी थेट मागणी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

ठाकरे यांच्याकडे पत्र देऊन ही मागणी केली असून उपजिल्हाप्रमुख महिला संघटिका स्मिता सावंत-मांडरे यांनी या जागेवर दावा केला आहे. सावंत या गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेत(ठाकरे गट) कार्यरत आहेत. कोल्हापूर शहरात शिवसेनेत महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी त्याचा सहभाग आहे. प्रत्येक आंदोलनात सावंत यांचा सहभाग असून त्यांनी कोल्हापूर शहरासह परिसरात सामाजिक उपक्रम घेत शिवसेना घराघरात पोहचविण्याचे कामं केले आहे. हाच धागा पकडत त्यांनी कोल्हापूर उत्तर मधून उमेदवारी देण्याची मागणी केली आहे.


कोल्हापूर उत्तर मधून उमेदवारी द्यावी ; ठाकरे गटाच्या स्मिता सावंत- मांडरे यांची मागणी