बातम्या

तर मी तुम्हाला जबाबदार धरणार ; संभाजीराजेंचा थेट इशारा

So I will hold you responsible


By nisha patil - 12/8/2024 4:53:53 PM
Share This News:



काही दिवसापूर्वीच विशाळगडमध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणावरून पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी संभाजीराजे यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती. यावर बोलताना संभाजीराजेंनी रोष व्यक्त करत हसन मुश्रीफ यांनी मला पुरोगामीत्व शिकवू नये अशा शब्दात मुश्रीफ यांना सुनावल आहे. विशाळगड प्रकरणानंतर आता केशवराव भोसले नाट्यगृह पुनर्बांधणीच्या अनुषंगाने  संभाजी राजे आणि हसन मुश्रीफ वाद वाढत असल्याचं बोललं जात आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी हसन मुश्रीफ यांच्याकडे हात वारे करत या पुनर्बांधणीमध्ये कमिशनचा घोळ झाल्यास सर्वात आधी मी तुमच्या अंगावर येईल अशा शब्दात दम भरला. शाहू छत्रपती यांनी बोलावले असली तर तरीही कामात कोणताही गैरप्रकार झाल्यास मी यासाठी तुम्हालाच जबाबदार धरणार असं संभाजीराजे यांनी हसन मुश्रीफ यांना दरडावलं. संभाजीराजे छत्रपती यांचा अचानक झालेला हा रुद्रावतार पाहून उपस्थित सर्वच अवाक झाले.


तर मी तुम्हाला जबाबदार धरणार ; संभाजीराजेंचा थेट इशारा