बातम्या

सोलरला वीज बिल आकारणी अन्यायकारक – आपचा महावितरणला इशारा

Solar electricity bill charging is unfair


By nisha patil - 2/27/2025 2:57:55 PM
Share This News:



सोलरला वीज बिल आकारणी अन्यायकारक – आपचा महावितरणला इशारा

केंद्र शासनाच्या सूर्यघर योजनेअंतर्गत अनेक ग्राहकांनी सौरऊर्जा उत्पादनासाठी सोलर पॅनल बसवले आहेत. महावितरणच्या नेट मिटरिंग योजनेतून वीज निर्माण करून अतिरिक्त वीज महावितरणला विकली जात असतानाही, ग्राहकांच्या रात्रीच्या वीज वापरावर बिल आकारण्याचा प्रस्ताव वीज नियामक आयोगाकडे पाठवण्यात आला आहे.

आम आदमी पार्टीने या प्रस्तावाला कडाडून विरोध दर्शवत, हा अन्यायकारक निर्णय त्वरित मागे घ्यावा अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. कोल्हापुरातील तब्बल ८ हजार ग्राहकांना याचा फटका बसणार असल्याचे स्पष्ट करत, आपच्या शिष्टमंडळाने महावितरणचे अधीक्षक अभियंता गणपत लटपटे यांना निवेदन सादर केले.

यावेळी शहराध्यक्ष उत्तम पाटील, सूरज सुर्वे, अभिजित कांबळे, समीर लतीफ, दुष्यंत माने, रवींद्र राऊत आदी पदाधिकारी उपस्थित होते.


सोलरला वीज बिल आकारणी अन्यायकारक – आपचा महावितरणला इशारा
Total Views: 43