बातम्या
यशस्वी मंच” व “मोहिनी पैठणी” यांच्या संयुक्त विद्यमाने घेतलेल्या वर्कशॉपला महिलाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद..
By nisha patil - 6/7/2024 5:34:00 PM
Share This News:
यशस्वी मंच" महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा, रोजगराची संधी मिळावी, रोजच्या धकधकीच्या जीवनातून विरंगुळा मिळावा, या उद्देशाने यशस्वी मंचची स्थापना करण्यात आली,
अनेक उपक्रम व मनोरंजक कार्यक्रम तसेच आपला व्यवसाय इतर लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी यशस्वी मंचने अनेक महिलांना दिली त्यातून रोजगार व उत्पन्न मिळावा असा व्यासपीठ देण्यात आला,त्यात सोबत विविध कार्यक्रम ही आयोजित करण्यात आले.
आज दिनांक ५ जुलै रोजी "यशस्वी मंच" व "मोहिनी पैठणी" यांच्या संयुक्त विद्यमाने मेकअप व हेअर स्टाईल वर्कशॉप देण्यात आलाआणि वटपौर्णिमेनिमित्त ठसकेबाज उखाणा ऑनलाइन स्पर्धा बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी कोल्हापूर व कोल्हापूरच्या बाहेरून महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, अनेक महिलांनी स्पर्धेच्या माध्यमातून आपली कला सादर केली.
या कार्यक्रमाची प्रमुख उपस्थिती मोहिनी पैठणी ग्रुपच्या तसेच यशस्वी मंचच्या संस्थापक अध्यक्ष मोहिनी वणकुंद्रे व यशस्वी मंचच्या संस्थापिका अध्यक्षा स्वप्नाली जगोजे या होत्या. ब्युटीशियन संगीता संकपाळ यांनी सर्व महिलांना मेकअप व हेअर स्टाईल चे प्रशिक्षण दिले तसेच,उखाणा स्पर्धेत सौ. नेहा निळकंठ वाळकी या प्रथम क्रमांकाच्या मानकरी ठरल्या.
यशस्वी मंच” व “मोहिनी पैठणी” यांच्या संयुक्त विद्यमाने घेतलेल्या वर्कशॉपला महिलाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद..
|