बातम्या
कोल्हापूर वॉकर्स ग्रुपच्या 'रंकाळा प्रदक्षिणा' उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद...
By nisha patil - 12/31/2024 10:44:10 PM
Share This News:
कोल्हापूर वॉकर्स ग्रुपच्या 'रंकाळा भोवती पाच फेरी, आरोग्य तेथे वास करी' या आरोग्यदायी मोहिमेच्या 10व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला कोल्हापूर आणि परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. 475 हून अधिक सहभागींच्या उपस्थितीत, 5 वर्षांच्या बालकांपासून ते 86 वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांपर्यंत, सर्व वयोगटातील लोकांनी आपल्या क्षमतेनुसार 1 ते 5 रंकाळा प्रदक्षिणा पूर्ण केल्या.
विशेषतः, आंतरराष्ट्रीय धावपटू श्री. महिपती संकपाळ यांनी 10 प्रदक्षिणा (सुमारे 45 किमी) धावत पूर्ण करून उपस्थितांचे लक्ष वेधले. कार्यक्रमाची सुरुवात पहाटे 4 वाजता देवस्थान समितीचे शिवराज नायकवडी आणि चेंबर्स ऑफ कॉमर्सचे संजय शेटे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून झाली. सकाळी 7:30 वाजता 5 प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर समारोप कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक आकाराम शिंदे, . वसंत पाटील, बंडू माने, आणि विलास तांबडे पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कोल्हापूर वॉकर्स ग्रुपचे अध्यक्ष . धोंडीराम चोपडे, बाळासाहेब भोगम, अजित मोरे, परशुराम नांदवडेकर, महिपती संकपाळ, नाना गवळी, राजेश पाटील, आणि जितेंद्र डोरले यांनी विशेष परिश्रम घेतले.
कोल्हापूर वॉकर्स ग्रुपच्या 'रंकाळा प्रदक्षिणा' उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद...
|