खेळ
क्रीडा स्पर्धा म्हणजे दिव्यांगांना कौशल्य सादर करण्याची चांगली संधी - जिल्हाधिकारी अमोल येडगे
By nisha patil - 5/2/2025 7:20:14 PM
Share This News:
कोल्हापूर, दि. 5 : समाज कल्याण विभागाने आयोजित दिव्यांगांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते झाले. या स्पर्धांमधून दिव्यांग विद्यार्थ्यांना आपले कौशल्य सादर करण्याची संधी मिळते, असे ते म्हणाले.
पोलीस परेड ग्राउंडवर पार पडलेल्या या कार्यक्रमात 18 दिव्यांग शाळांमधून 265 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यशस्वी खेळाडूंना प्रमाणपत्र आणि बक्षिसे देण्यात आली. राष्ट्रीय स्पर्धेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
जिल्हा समाज कल्याण अधिकारी संभाजी पोवार यांनी दिव्यांगांच्या कौशल्यांना वाव देण्यासाठी समाज कल्याण विभागाचे विविध उपक्रम सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी साधना कांबळे यांनी दिव्यांगांसाठी चालू असलेल्या योजनांची माहिती दिली.
क्रीडा स्पर्धा म्हणजे दिव्यांगांना कौशल्य सादर करण्याची चांगली संधी - जिल्हाधिकारी अमोल येडगे
|