बातम्या
प्रसाद जाधवच्या शैक्षणिक वाटचालीसाठी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कटिबद्ध
By nisha patil - 2/24/2025 9:32:06 PM
Share This News:
प्रसाद जाधवच्या शैक्षणिक वाटचालीसाठी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कटिबद्ध
- प्राचार्य अभयकुमार साळुंखे
कोल्हापूर, 24 फेब्रुवारी 2025: श्री पाराशर हायस्कूल, पारगाव येथील दहावीतील विद्यार्थी प्रसाद संजय जाधव याने "डे विथ कलेक्टर" उपक्रमांतर्गत कोल्हापूर जिल्हाधिकारी मा. अमोल येडगे यांच्यासोबत प्रशासकीय कामकाज अनुभवण्याचा बहुमान मिळवला आहे.
प्रसादच्या यशाबद्दल श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी त्याचा विशेष गौरव केला व संस्थेच्या वतीने त्याच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मा. कौस्तुभ गावडे यांनी अत्याधुनिक टॅब (संगणक) प्रदान करून प्रसादला विज्ञान प्रदर्शनातील नाविन्यपूर्ण संशोधनासाठी प्रेरित केले. प्रसादने सलग दोन वर्षे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात दिव्यांग गटात प्रथम क्रमांक पटकावला असून प्लास्टिक पुनर्वापर हा त्याच्या अभ्यासाचा विशेष विषय आहे.
प्रसादच्या या यशात त्याच्या विज्ञान शिक्षिका सौ. स्वाती कोकितकर, मुख्याध्यापक एन. आर. यादव, तसेच पालक संजय व नम्रता जाधव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
प्रसाद जाधवच्या शैक्षणिक वाटचालीसाठी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कटिबद्ध
|