बातम्या

स्टार बहुचर्चित चित्रपट कल्कि 2898 एडी बॉक्स ऑफिसवर........

Star hit movie Kalki 2898 AD box office


By nisha patil - 7/24/2024 11:16:51 PM
Share This News:



 कल्कि 2898  एडी चित्रपटाच्या दुसऱ्या भागाबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. नाग अश्विन दिग्दर्शित कल्की 2898 AD च्या पहिल्या भागाने आपल्या अनोख्या कथा आणि उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. आता निर्माते या चित्रपटाच्या पुढील अंतिम भागाची तयारी करत असल्याची माहिती समोर आली आहे, त्यामुळे चाहत्यांमध्ये कल्किचा सिक्वेल पाहण्याची आतुरता वाढत चालली आहे. प्रभास आणि दीपिकासोबत चित्रपटाचा शेवटचा भाग आणखी भव्य असणार आहे.अभिनेता प्रभास,दीपिका पादुकोण  आणि अमिताभ बच्चन  स्टार बहुचर्चित चित्रपट कल्कि 2898  एडी  बॉक्स ऑफिसवर सुपर-डुपर हिट ठरला. या चित्रपटाने जगभरात रेकॉर्डब्रेक कमाई केली. कल्कि चित्रपटाने प्री-बुकींगपासूनच वेगवेगळे विक्रम स्वत:च्या नावावर केले आहेत. या चित्रपटाने जगभरात 1000 कोटींची कमाई केली आहे. कल्कि चित्रपटाचा पहिला भाग पाहिल्यानंतर प्रेक्षकांना दुसऱ्या भागाची प्रतीक्षा लागून राहिली आहे. दिग्दर्शक नाग अश्विननेही पहिल्या चित्रपटात दीपिकाच्या महत्त्वाच्या भूमिकेवर भर दिला होता, तसेच दीपिकाची व्यक्तिरेखा कथेचा केंद्रबिंदू असल्याचेही स्पष्ट केलं होतं. नाग अश्विन म्हणाला होता, 'दीपिका कथेचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे, कारण तिचं पात्र काढून टाकलं तर, कथा टिकणार नाही, कल्की राहणार नाही.'


स्टार बहुचर्चित चित्रपट कल्कि 2898 एडी बॉक्स ऑफिसवर........