बातम्या

राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांचा जिल्हा दौरा

State Food Commission Chairman


By nisha patil - 2/25/2025 8:51:23 PM
Share This News:



राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांचा जिल्हा दौरा

कोल्हापूर, : राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे २६ फेब्रुवारी ते १ मार्च २०२५ या कालावधीत कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत.

दौऱ्याचा तपशील:

🔹 २६ फेब्रुवारी: कोल्हापूर येथे आगमन व मुक्काम.
🔹 २७ फेब्रुवारी:

  • सकाळी १०.३० वा. – जिल्हाधिकारी कार्यालयात आधारवर आधारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा आढावा.
  • सकाळी ११.३० वा. – शालेय पोषण आहार योजनेचा आढावा.
  • दुपारी १.०० वा. – महिला व बाल विकास सेवा योजनांचा आढावा.
  • दुपारी २.३० वा. – शासकीय धान्य गोदाम, स्वस्त धान्य दुकाने, शाळा, अंगणवाडी आणि लाभार्थ्यांना भेटी.

🔹 २८ फेब्रुवारी व १ मार्च:

  • सकाळी १०.३० ते सायं. ६.०० वा.धान्य गोदामे, पोषण आहार पुरवठादार, अंगणवाड्या आणि स्वयंपाकगृहांना भेटी.
    🔹 १ मार्च सायं. ७.०० वा.: कोल्हापूर येथून मुंबईकडे प्रस्थान.

महत्वाचा उद्देश:

महेश ढवळे यांच्या दौऱ्यात सार्वजनिक वितरण प्रणाली, शालेय पोषण आहार, महिला व बाल विकास योजनांचा आढावा घेतला जाणार आहे. संबंधित विभागांनी आवश्यक ती तयारी ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

 


राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांचा जिल्हा दौरा
Total Views: 62