बातम्या
राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांची आ. अमल महाडिकांनी घेतली भेट...
By nisha patil - 2/22/2025 12:48:04 PM
Share This News:
कन्नड रक्षक वेदिकेच्या गुंडांनी काल महाराष्ट्राच्या एसटीला आणि कर्मचाऱ्याला कन्नड बोलता येते का अशी विचारणा करून तोंडाला काळं फासल्याची घटना घडली आहे. कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे ही घटना घडलीय.या प्रकाराविरोधात आज कोल्हापुरात शिवसेना ठाकरे गट आक्रमक झालाय. कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानक परिसरात कर्नाटक सरकार विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आलय.
यावेळी बोलताना.. ठाकरे गट सह संपर्कप्रमुख विजय देवणे यांनी संताप व्यक्त करत कन्नड रक्षक वेदिका संघटना, कर्नाटक सरकारला थेट आव्हान दिलंय.
दरम्यान आंदोलनाप्रसंगी कर्नाटकच्या गाड्यांना महाराष्ट्राचा भगवा ध्वज लावून पुन्हा कर्नाटकच्या दिशेने रवाना करण्यात आलंय. याप्रसंगी ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. शाहूपुरी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलंय.
राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांची आ. अमल महाडिकांनी घेतली भेट...
|