बातम्या

Still I Rise'जाणून घ्या त्याचा अर्थ

Still I Rise


By nisha patil - 7/29/2024 4:48:37 PM
Share This News:



मनू भाकरसाठी  'स्टिल आय राइज हे शब्द आणि  भावना खेळाच्या  कारकिर्दीशी अगदी चपखल बसणाऱ्या आहेत. म्हणून मी या कवितेच्या ओळीच गोंदवून घ्यायचं ठरवलं होतं.'ऑलिंपिक पदक विजेती मनू भाकरने अशाप्रकारे तिच्या टॅटूबद्दलच्या भावना सांगितल्या होत्या. एखाद्या खेळाडूसाठी स्वयंप्रेरणा अत्यंत महत्त्वाची असते. त्याची प्रक्रिया उलगडून दाखवण्याचा प्रयत्न क्रीडा पत्रकार सौरभ दुग्गल यांनी आपल्या लेखाच्या माध्यमातून केला आहे.

                 
भारतीय नेमबाज मनू भाकरसाठी टोकियो 2020 च्या ऑलिंपिकच्या वेळचा काळ खूप अवघड होता. ऐन स्पर्धेदरम्यान तिचं पिस्तुल नादुरुस्त झालं होतं. पण काहीही झालं तरी हार मानायची नाही, ही प्रेरणा तिला मिळाली.त्या अर्थाचा एक टॅटू तिने तिच्या मानेवर गोंदवला. त्यावरच्या अक्षरांप्रमाणेच 'Still I Rise' अशी प्रेरणा घेत ती या वर्षीच्या ऑलिंपिक स्पर्धेला सामोरी गेली आणि रविवारी भारतासाठी या स्पर्धेतलं पहिलं वहिलं पदक जिंकून दिलं.
मनू भाकरला पॅरिस ऑलिंपिकमध्ये ब्राँझ पदक मिळालं आणि तिने इतिहास रचला. ऑलिंपिक पदक मिळवणारी ती पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली आहे.
             
  10 मीटर एअर पिस्टल प्रकारात तिने हे पदक मिळवलं आणि त्याबरोबरच भारतासाठी पॅरिस ऑलिंपिकमध्ये विजयाचं खातंही उघडलं.


Still I Rise'जाणून घ्या त्याचा अर्थ