ग्रामीण

' डे विथ कलेक्टर ' या उपक्रमामुळे विद्यार्थी प्रसाद जाधव चर्चेत...

Student Prasad Jadhav is in discussion


By nisha patil - 1/23/2025 2:03:28 PM
Share This News:



' डे विथ कलेक्टर '  या उपक्रमामुळे विद्यार्थी प्रसाद जाधव चर्चेत...

आम. डॉ. विनय कोरे यांनीही यांनीही केले कौतुक..

बहिरेवाडी (ता.पन्हाळा) येथील प्रसाद संजय जाधव यांने "डे विथ कलेक्टर" उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या सोबत प्रशासकीय कामकाजाचे धडे गिरवल्याबद्दल त्यांच्या या कामगिरीचे आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी अभिनंदन करत त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या...

हातकणंगले तालुक्यातील पारगाव येथील श्री पाराशर हायस्कूल या शाळेतील इयत्ता दहावी चा विद्यार्थी .प्रसाद संजय जाधव (रा.बहिरेवाडी) याने जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात दिव्यांग गटामध्ये गेले तीन वर्ष प्रथम क्रमांक पटकाविल्याबद्दल तसेच "प्लॅस्टिक पुनर्वापर" या विषयावर केलेल्या उपकरणावर कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी त्याचे विशेष कौतुक म्हणून त्यांच्या समवेत एक दिवसाच्या कामकाजात त्याला समावेश करून घेतले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठकांमध्ये प्रसादने उपस्थित राहून कामकाजाची माहिती घेतल्याचे पाहून आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी त्याच्या जिज्ञासू वृत्तीचे व या उपक्रमाचे कौतुक केले...यावेळी बहिरेवाडी गावचे माजी सरपंच शिरिषकुमार जाधव,विज्ञान शिक्षिका स्वाती विनायक कोकीतकर,प्रसादची आई नम्रता संजय जाधव व वडील संजय आनंदराव जाधव आदी मान्यवर उपस्थित होते...


' डे विथ कलेक्टर ' या उपक्रमामुळे विद्यार्थी प्रसाद जाधव चर्चेत...
Total Views: 43