विशेष बातम्या

नगरपालिकेच्या शाळांतील विद्यार्थी करू लागले "रोबो" – कोरगावकर हायस्कूलचा अभिनव उपक्रम

Students from municipal schools started


By nisha patil - 3/22/2025 8:13:42 PM
Share This News:



नगरपालिकेच्या शाळांतील विद्यार्थी करू लागले "रोबो" – कोरगावकर हायस्कूलचा अभिनव उपक्रम

आंतरभारती शिक्षण मंडळ संचलित कोरगावकर हायस्कूलने महानगरपालिकेच्या सद्गुरु गाडगे महाराज शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी "समूह शाळा क्षेत्रभेट" उपक्रम राबवून त्यांच्या कुतूहलाला चालना दिली.

विद्यार्थ्यांना अटल टिंकरिंग लॅबमध्ये रोबो तयार करण्याचे प्रशिक्षण विज्ञान शिक्षक सतीश नंदनवार आणि हायस्कूलच्या तंत्रज्ञान प्रशिक्षित विद्यार्थ्यांनी दिले. प्रयोगशाळा, सुसज्ज ग्रंथालय, कलादालन पाहून विद्यार्थी भारावून गेले. मुख्याध्यापक संजय सौंदलगे यांनी या उपक्रमामुळे वैज्ञानिक दृष्टिकोन आणि तंत्रज्ञान कौशल्ये विकसित होतील असे मत व्यक्त केले.

विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालयात वाचनसंस्कृतीविषयी माहिती देण्यात आली, तसेच कलाशिक्षण अंतर्गत स्टोन पेंटिंग, वॉल पेंटिंग आणि हस्तकला पाहण्याचा अनुभव मिळाला. संगणक कक्ष आणि इतर शैक्षणिक सुविधा पाहून विद्यार्थी आनंदित झाले.

या उपक्रमाचे संस्था सचिव एम.एस. पाटोळे, कार्याध्यक्षा पल्लवी कोरगावकर आणि अध्यक्षा सुचेता कोरगावकर यांनी विशेष कौतुक केले. भविष्यात इतर शाळांनाही या उपक्रमात सहभागी करून शाळाशाळांतील आंतरक्रिया वाढवण्याचा संकल्प मुख्याध्यापकांनी व्यक्त केला.


नगरपालिकेच्या शाळांतील विद्यार्थी करू लागले "रोबो" – कोरगावकर हायस्कूलचा अभिनव उपक्रम
Total Views: 24