राजकीय
सीपीआरमधील फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव तात्काळ सादर करा: आमदार राजेश क्षीरसागर
By nisha patil - 1/19/2025 5:10:12 PM
Share This News:
सीपीआरमधील फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव तात्काळ सादर करा: आमदार राजेश क्षीरसागर
कोल्हापूर: सीपीआर रुग्णालय परिसरातील फेरीवाल्यांविरोधात अतिक्रमण कारवाई सुरू झाल्यानंतर आमदार राजेश क्षीरसागर यांनी प्रशासनाला तात्काळ पुनर्वसनाचा प्रस्ताव सादर करण्याची सूचना दिली. "प्रथम फेरीवाल्यांचे पुनर्वसन करा, मगच अतिक्रमणाची कारवाई करा," असे ते म्हणाले.
फेरीवाल्यांवरील अन्याय न करता, रुग्णालय परिसरात कोणताही व्यत्यय न येता त्यांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया हाती घेतली जावी, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी, सीपीआर रुग्णालयात अवैध कारभारावर कडक कारवाई केली जाईल, अशी सूचनाही आमदार क्षीरसागर यांनी दिली.
सीपीआरमधील फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव तात्काळ सादर करा: आमदार राजेश क्षीरसागर
|