बातम्या

विस्थापित जनावरांसाठी तात्पुरत्या स्वरुपात उभारण्यात आलेल्या छावणीतील जनावरांना चारा, पशुखाद्य व पाणी पुरविण्यासाठी दरपत्रके सादर करा

Submit rates for providing fodder


By nisha patil - 7/16/2024 9:11:54 PM
Share This News:



सन २०१९ व २०२१  मध्ये कोल्हापूर जिल्ह्यात  मोठ्या प्रमाणात नद्यांना पूर आला होता. पुरामध्ये एकूण ६७ गावे बाधित (२७ पूर्ण व ४० अंशतः बाधित) झाली होती. त्यामुळे पूरग्रस्त जनावरांना सुरक्षित ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात विस्थापित करण्यात आले होते. सन २०२४ मध्ये हवामान खात्याने मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली असून कोल्हापूर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी तथा आपत्कालीन समितीच्या अध्यक्षांनी दिलेल्या सूचनांनुसार संभाव्य विस्थापित कराव्या लागणाऱ्या जनावरांकरिता तात्पुरत्या स्वरुपात उभारण्यात आलेल्या छावणीमध्ये दाखल झालेल्या जनावरांना चारा, पशुखाद्य व मुबलक पाणी पुरविण्यासाठी सेवाभावी संस्था, उत्पादक,पुरवठादार यांच्याकडून चारामुरघास  करिता  दरपत्रके मागविण्यात येत आहेत. मुद क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या संस्थांनी दिनांक २४ जुलै २०२४ पर्यंत शासकीय वेळेत बंद लिफाफ्यामध्ये चाऱ्याच्या प्रकारानुसार तालुका निहाय वाहतुकीसह जागा पोहोच प्रति टन याप्रमाणे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त  कार्यालयमध्यवर्ती अंडी उबवणी केंद्र आवार, ताराबाई पार्क,कोल्हापूर-०३ या कार्यालयास टपालाने अथवा समक्ष दरपत्रके सादर करावीत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन (मु), तथा सदस्य सचिव डॉ.एम.ए.शेजाळ यांनी केले आहे.

उशिराने प्राप्त होणाऱ्या दरपत्रकांचा विचार केला जाणार नाही. दरपत्रके जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त  कार्यालयमध्यवर्ती अंडी उबवणी केंद्र आवार, ताराबाई पार्क,कोल्हापूर-०३ यांच्या दालनात दिनांक २५ जुलै २०२४ रोजी दुपारी ठीक 12 वाजता उघडण्यात येतील.

अटी व शर्ती :

            सन २०१९ व २०२१ मध्ये खालीलप्रमाणे गावे पुरामुळे पूर्णतः बाधित झाली होती.

करवीर तालुका : आरेप्रयाग चिखली व आंबेवाडी

 शिरोळ तालुका :  शिरटी कुरुंदवाडबस्तवाडआलास बुबनाळराजापुरराजापुरवाडीखिद्रापूरनृसिंहवाडी  औरवाडगौरवाडहसुरकनवाड कुट्वाडअर्जुनवाडघालवाडजुने दानवाडनवे दानवाडकवठेसार

        हातकणंगले तालुका : निलेवाडीचावरेजुने पारगावइंगळी  व चंदूर.

  छावणीत दाखल होणाऱ्या मोठ्या व लहान जनावरांना पिण्यासाठी पुरेशा प्रमाणात स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्यात यावे.   शासन निकषाप्रमाणे छावणीत दाखल झालेल्या प्रति मोठ्या व लहान जनावरास प्रतिदिन वाळलेला किंवा हिरवा चारा व पशुखाद्य खालीलप्रमाणे देण्यात यावे.

हिरवा चारा (मका, ऊस,उसाचे वाढे) मोठी जनावरे१८ किलोग्रॅम व लहान जनावरे०९ किलोग्रॅम

पशुखाद्य (आठवड्यातून ३ दिवस १ दिवसाआड)मोठी जनावरे१ किलोग्रॅम व लहान जनावरे०.५  किलोग्रॅम किंवा

वाळलेला चारा (कडबा किंवा कडब्याची कुट्टी,वाळलेला चारा किंवा वाळलेले गवत)मोठी जनावरे6 किलोग्रॅम व लहान जनावरे3 किलोग्रॅम

पशुखाद्य (आठवड्यातून ३ दिवस १ दिवसाआड)मोठी जनावरे१ किलोग्रॅम व लहान जनावरे0.5 किलोग्रॅम किंवा मक्याचा मुरघास मोठी जनावरे८ किलो व लहान जनावरे४ किलो याप्रमाणे आहे.

अटी व शर्ती:

 दरपत्रके सादर करताना ती जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, मध्यवर्ती अंडी उबवणूक केंद्र आवार, ताराबाई पार्क, कोल्हापूर यांचे नावे सादर करावेत. दरपत्रके सादर करताना तालुकानिहाय चाऱ्याचा प्रकारानुसार प्रति टन दर व वाहतुकीसह जागा पोहोच  पुरवठा करण्याचा दर स्वतंत्ररीत्या दर्शविण्यात यावा.  चाऱ्याची भरणी व उतरणी करण्याचा खर्च पुरवठादार यांनी करावयाचा आहे. चारा पुरवठा करताना भरलेल्या गाडीचे वजन काटा पावती व मोकळ्या झालेल्या गाडीचे वजन काटा पावती सादर करणे बंधनकारक राहील जी गाडी चारा वाहतुकीसाठी वापरलेली आहे त्या गाडीची कागदपत्रे (वाहन नोंदणी पत्र) सादर करणे बंधनकारक राहील. चारा पुरवठा आदेश दिल्यानंतर तात्काळ दिलेल्या मार्गानुसार चारा पुरवठा करावयचा आहे. वाहतुकीचे दर हे गाडीच्या प्रकारानुसार व प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी निर्धारित केलेल्या दरानुसार अनुज्ञेय असतील. उक्त नमूद चारा निशुल्क दराने पुरावठादारसेवा भावी संस्थागोरक्षणासाठी कार्यरत संस्था तयार असल्यास त्यांनी सुद्धा आपली नावे व आपण पुरवठा करु इच्छीणाऱ्या गावांची नावे कळवावीत.   शासन निर्णयानुसार मक्याच्या मुरघासाची किंमत रुपये ६.५० पैसे/किलो ग्राम एवढी निश्चित करण्यात आलेली आहे याची नोंद घेण्यात यावी. अर्जाचा नमुना व अटी व शर्ती याबाबतची माहिती जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्या kolhapur.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी,जिल्हा परिषदकोल्हापूर अथवा जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालय, अंडी उबवणूक केंद्र आवार, ताराबाई पार्क,कोल्हापूर यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा.


विस्थापित जनावरांसाठी तात्पुरत्या स्वरुपात उभारण्यात आलेल्या छावणीतील जनावरांना चारा, पशुखाद्य व पाणी पुरविण्यासाठी दरपत्रके सादर करा