बातम्या

लाडकी बहीण" योजनेचे यश सावत्रभावांच्या डोळ्यात खुपते : राजेश क्षीरसागर

Success of aLadaki Bahin


By nisha patil - 8/24/2024 2:54:19 PM
Share This News:



मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे बोलतात ते करून दाखवतात. मुलींना मोफत शिक्षण, शेतकऱ्यांना कर्जमाफी, लाडक्या भावांना विद्यावेतन यासह विशेषतः लाडक्या बहिणींचे सबलीकरण करण्यासाठी यशस्वीरीत्या राबविण्यात आलेली "लाडकी बहीण" योजना असो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समाजातील सर्वच घटकांच्या प्रगतीसाठी कार्यरत आहेत.

त्यांची वाढती लोकप्रियता पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बद्दल बेताल वक्तव्ये केली जात आहेत. ही वक्तव्ये निषेदार्ह असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लोकप्रियता व लाडकी बहीण योजनेचे यश सावत्रभावांच्या डोळ्यात खुपत असल्याचे टीका राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष .राजेश क्षीरसागर यांनी केली आहे.काल कॉंग्रेस कमिटीत झालेल्या बैठकीत माजी पालकमंत्री सतेज पाटील यांनी केलेल्या टीकेला राजेश क्षीरसागर यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.


लाडकी बहीण" योजनेचे यश सावत्रभावांच्या डोळ्यात खुपते : राजेश क्षीरसागर