बातम्या

चौपदरीकरणासाठी आंदोलनास यश..

Success of movement for quadrupling


By nisha patil - 9/23/2024 6:53:11 PM
Share This News:



भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या कोल्हापूर विभागाने चौपदरीकरणाचे काम सुरू करण्यासाठी निविदा प्रक्रिया प्रसिद्ध केली आहे. यासाठी रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवून चौपदरीकरणाचे काम सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती प्राधिकरणाच्या कोल्हापूर प्रकल्प संचालकांनी दिली आहे.

आंदोलनकर्त्यांना लेखी आश्वासन देताना संबंधित अभियंता श्री. महेश पाटोळे यांनी आंदोलनाच्या स्थळी हे पत्र सुपूर्द केले. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी चौपदरीकरणाचे काम तातडीने सुरू न झाल्यास पुढील आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला.

या आंदोलनात भोकरे, रमेश कांबळे, भैया कांबळे, योगेश चोकाककर, मनोज कोळी, अमर आठवले, नदाफ चाचा, रमेश शिंदे, सुनील शिंदे, संजीव पाटील, प्रशांत शिंदे, राजेश पाटील, पिंटू किनिंगे, अमित दाशाल यांनी सहभाग घेतला. जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला.


चौपदरीकरणासाठी आंदोलनास यश..