बातम्या
"यशस्वी उद्योजिका सन्मान 2025" – राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यासाठी नामांकन खुले!
By nisha patil - 2/24/2025 2:54:40 PM
Share This News:
"यशस्वी उद्योजिका सन्मान 2025" – राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यासाठी नामांकन खुले!
जागतिक महिला दिनानिमित्त "यशस्वी मंच" तर्फे राज्यस्तरीय "यशस्वी उद्योजिका सन्मान 2025" पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा भव्य सोहळा विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यासाठी आयोजित केला जात आहे.
उद्योग, राजकारण, समाजकार्य, शिक्षण, कला, क्रीडा, फॅशन, सांस्कृतिक तसेच मनोरंजन क्षेत्रातील महिलांना या पुरस्कारासाठी सन्मानित करण्यात येणार आहे. महिलांनी आपल्या योगदानाची दखल घेत यामध्ये सहभागी व्हावे आणि आपल्या कार्याचा गौरव करून घ्यावा.
या कार्यक्रमाचे आयोजन यशस्वी मंचच्या संस्थापिका अध्यक्षा मोहिनी वनकुदरे आणि स्वप्नाली जगोची यांनी केले असून, या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी इच्छुक महिलांनी तत्काळ संपर्क साधावा
महिला सशक्तीकरणाच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलण्याची ही उत्तम संधी आहे. तुमच्या यशोगाथेला राज्यस्तरीय सन्मान मिळावा, यासाठी आजच नोंदणी करा!

|