बातम्या

देशभक्ती आणि राष्ट्र अभिमानाची भावना जागृत करण्यासाठी तिरंगा देशभक्ती दौडचे यशस्वी आयोजन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याहस्ते शुभारंभ

Successful organization of tricolor patriotism


By nisha patil - 8/14/2024 4:08:53 PM
Share This News:



देशाचा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यासाठी, प्रत्येक भारतीयाला राष्ट्रध्वज, तिरंगा फडकवण्यासाठी प्रोत्साहीत करुन नागरिकांमध्ये देशभक्ती आणि राष्ट्र अभिमानाची भावना जागृत करण्यासाठी  जिल्हा प्रशासनातर्फे पोलीस परेड ग्राऊंड, कसबा बावडा, कोल्हापूर येथे तिरंगा देशभक्ती दौडचे यशस्वी आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी उपस्थित सहभीगींना शुभेच्छा देवून ध्वज दाखवून शुभारंभ केला. हर घर तिरंगा ही आपल्या देशामध्ये लोक चळवळ बनलेली आहे. स्वातंत्र्य सैनिक आणि वीर हुतात्मे यांच्या राष्ट्रभक्तीचा, त्यांच्या बलिदानाचा सन्मान आणि भारताच्या सर्वांगिण विकासासाठी आपण सर्वांनीच कटिबद्ध होणे हा प्रत्येक भारतीयाचा सन्मान व कर्तव्य आहे.  यावेळी अशा आशयाची प्रतिज्ञा सर्व रनर्सला देण्यात आली. यावेळी अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, उपजिल्हाधिकारी संपत खिलारी, जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे, तहसीलदार तथा जिल्हा करमणूक अधिकारी सैपन नदाफ यांच्यासह इतर विभाग प्रमुख, अधिकारी कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तिरंगा दौड 2024 पोलीस क्रीडांगण येथून सुरू झाली पुढे पितळी गणपती, धैर्यप्रसाद चौक, आदित्य कॉर्नर, जिल्हाधिकारी कार्यालय, सी.पी.आर. चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, भवानी मंडप व बिंदू चौक व परत पोलीस ग्राऊंड असा धावण्याचा मार्ग होता. यामध्ये 3 कि.मी, 5 कि.मी. व 10 कि.मी. धावण्यासाठी वेगवेगळ्या धावपटूंनी सहभाग नोंदविला. पोलीस क्रीडांगणावर परतल्यानंतर सर्वांनी सेल्फी केंद्रावर तिरंगा संदेश असलेल्या ठिकाणी छायाचित्र घेतले. तसेच त्या ठिकाणी तिरंगा संदेश फलक अर्थात साईन बोर्ड ठेवण्यात आला होता. त्याठिकाणीही मोठ्या प्रमाणात धावपटूंनी स्वाक्षरी व संदेश लिहले.


देशभक्ती आणि राष्ट्र अभिमानाची भावना जागृत करण्यासाठी तिरंगा देशभक्ती दौडचे यशस्वी आयोजन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याहस्ते शुभारंभ