बातम्या
शाहू साखर कारखान्याचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वाढीव ऊस दराचा लाभ
By nisha patil - 11/2/2025 8:24:25 PM
Share This News:
शाहू साखर कारखान्याचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वाढीव ऊस दराचा लाभ
कागल: श्री. छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याने सोळा फेब्रुवारी २०२५पासून गाळपास येणाऱ्या ऊसाला वाढीव प्रोत्साहनात्मक ऊस दर देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे यांनी दिली.
फेब्रुवारीच्या दुसऱ्या पंधरवड्यात गळीतास येणाऱ्या ऊसाला प्रति टन ₹३१५०, तर मार्च महिन्यातील ऊसाला प्रति टन ₹३२०० दर मिळणार आहे. शेतकऱ्यांनी कारखान्याकडे नोंदविलेला संपूर्ण ऊस गळीतास पाठवावा व वाढीव दराचा लाभ घ्यावा, असे आवाहन घोरपडे यांनी केले.
यावेळी कारखान्याचे सर्व संचालक व कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण उपस्थित होते.
शाहू साखर कारखान्याचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वाढीव ऊस दराचा लाभ
|