बातम्या
सुजित मिणचेकर शिंदे गटात दाखल होणार...
By nisha patil - 2/24/2025 9:45:34 PM
Share This News:
सुजित मिणचेकर शिंदे गटात दाखल होणार...
मिणचेकरांचा शिंदे गटात प्रवेश निश्चित
हातकणंगलेचे माजी आमदार आणि गोकुळ दूध संघाचे संचालक डॉ. सुजित मिणचेकर हे अखेर शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश करणार आहेत. 27 तारखेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश होईल.
शिवसेना (ठाकरे गट) सोडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेत गेलेले डॉ. सुजित मिणचेकर आता शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश करणार आहेत.निवडणुकीवेळी शिवसेना ठाकरे गटाला रामराम केलेले डॉ. मिणचेकर आता खासदार धैर्यशील माने यांच्या माध्यमातून गुरुवारी 27 रोजी पक्षप्रमुख व उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेचे आजी-माजी पदाधिकारी, आजी माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्य, तसेच हजारो मिणचेकर प्रेमीसह पुन्हा शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
सुजित मिणचेकर शिंदे गटात दाखल होणार...
|