बातम्या
'मोदीजींना साथ म्हणजेच विकासाला साथ'
By nisha patil - 9/25/2024 8:09:11 PM
Share This News:
आमदार प्रकाशआण्णा आवाडे व जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांची भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये जाहीर प्रवेश करण्याच्या संदर्भात ताराराणी पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी, महिला आघाडी, कार्यकर्ते व आवाडे समर्थक यांची ताराराणी पक्ष कार्यालय, इचलकरंजी येथे आमदार प्रकाशआण्णा आवाडे व मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या अध्यक्षतेखाली व माजी नगराध्यक्षा सौ. किशोरीताई आवाडे, कल्लाप्पाण्णा आवाडे जनता बँकेचे चेअरमन स्वप्निल दादा आवाडे, सौ. मोश्मी आवाडे वहिनी यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली.
याप्रसंगी भारतीय जनता पार्टीच्या बळकटीकरणासाठी आणि जनता व भाजपामध्ये असलेले विश्वासाचे नाते आणखी दृढ करण्यासाठी आपले योगदान देवू असे आमदार प्रकाशआण्णा आवाडे व जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांनी सांगितले.
यावेळी ताराराणी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, ताराराणी पक्ष महिला आघाडीच्या अध्यक्षा उर्मिला गायकवाड, ताराराणी पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी, महिला आघाडी, आवाडे समर्थक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
'मोदीजींना साथ म्हणजेच विकासाला साथ'
|