शैक्षणिक
शिवाजी विद्यापीठातील परिसंवादात सूर
By nisha patil - 1/29/2025 9:38:27 PM
Share This News:
मराठी भाषेच्या उत्पत्तीविषयक सिद्धांतांची पुनर्मीमांसा - शिवाजी विद्यापीठात परिसंवाद
कोल्हापूर, दि. २९ जानेवारी: शिवाजी विद्यापीठात मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यांतर्गत ‘मराठी भाषेच्या उत्पत्तीविषयक सिद्धांतांची पुनर्मीमांसा’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला. रवींद्र इंगळे-चावरेकर, डॉ. दिलीप चव्हाण, आणि डॉ. गोमटेश्वर पाटील यांनी भाषेच्या इतिहासावर विचार मांडले.
इंगळे-चावरेकर यांनी मराठी भाषेचा प्रवास सिंधुसंस्कृतीपासून जोडला, तर चव्हाण यांनी भाषाशुद्धतेच्या महत्वावर भर दिला. पाटील यांनी महाराष्ट्रीय अपभ्रंशातून मराठीचा पूर्वेतिहास शोधण्याबद्दल चर्चा केली. अध्यक्ष डॉ. महादेव देशमुख यांनी भाषेच्या विविध रूपांवर विचार मांडले आणि परिसंवादाचे दस्तावेजीकरण करण्याची आवश्यकता व्यक्त केली.
शिवाजी विद्यापीठातील परिसंवादात सूर
|