बातम्या
सुरज चव्हाणला नशिबाने दिला गोलीगत धोका...
By nisha patil - 7/30/2024 6:17:53 PM
Share This News:
सुरज चव्हाणला नशिबाने दिला गोलीगत धोका...
कॅन्सरने वडिलांना आणि परिस्थितीने आई-आजीला न्हेलं
यंदाच्या 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनची जोमदार सुरुवात झाली आहे. बिग बॉसच्या घरात प्रवेश केल्यानंतर सगळ्याच 16 स्पर्धकांनी एकमेकांशी ओळख वाढवण्यासाठी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. गुलिगत धोका असे म्हणत सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या सूरज चव्हाणवर सगळ्यांची नजर खिळली आहे. बिग बॉसच्या पहिल्याच दिवशी घरातील लोकांसोबत बोलताना सूरजने आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली.
आपल्या रील्सने लोकांना हसवणाऱ्या सूरज चव्हाणने नशिबाने आपल्यसोबत कसा गुलिगत धोका दिला, हे घरातील इतर सदस्यांसोबत बोलताना सांगितले. पॅडी कांबळे, सूरज चव्हाण, योगिता चव्हाण आणि घरातील काही सदस्य गप्पा मारत होते. त्यावेळी सूरजने आपल्या आयुष्यातील काही प्रसंग सांगितले.
बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्यांसोबत सूरजने सांगितले की, बालपणापासून हलाखीच्या परिस्थितीत दिवस काढले. लहान असताना वडिलांचे कॅन्सरने निधन झाले. वडिलांच्या निधनाने आईला प्रचंड धक्का बसला. वडिलांच्या आजारापणामुळे सतत असलेली चिंता आणि त्यांच्या निधनानंतर आईला खूपच धक्का बसला. त्यानंतर एके दिवशी आईला रक्ताची उलटी झाली. माझी आई आणि आजी या दोघींचे एकाच दिवशी निधन झाले असल्याचे सूरजने सांगितले
सुरज चव्हाणला नशिबाने दिला गोलीगत धोका...
|