बातम्या

सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट - सुषमा चोरडिया

Suryadatta Group of Institutes  Sushma Chordia


By nisha patil - 9/30/2024 2:43:00 PM
Share This News:



कोल्हापूर, ता. ३० : पुण्यातील सूर्यदत्ता कॉलेज ऑफ नर्सिंग येथे गरजू मुलींसाठी शिक्षणाचा सर्व खर्च केला जाईल, अशी माहिती सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशनच्या उपाध्यक्ष सौ. सुषमा चोरडिया यांनी दिली.

नर्सिंग क्षेत्रात कुशल आणि तज्ज्ञ व्यावसायिक निर्माण करणे, या उद्देशाने ही संस्था सुरू करण्यात आली आहे. या महाविद्यालयाने अत्याधुनिक शिक्षण तंत्र, वैद्यकीय सुविधा आणि प्रत्यक्ष अनुभव यांचा संगम साधून विद्यार्थ्यांसाठी आदर्श व्यासपीठ उभारले आहे. सूर्यदत्ता कॉलेज ऑफ नर्सिंग विद्यार्थ्यांना केवळ नर्सिंगचे पुस्तकी धडे शिकवत नाही, तर त्याचा प्रत्यक्ष रुग्णसेवा करताना कसा वापर करावा, याचे प्रशिक्षणही देण्यावर भर दिला जातो. आधुनिक काळात शिक्षणात आमूलाग्र बदल झाले आहेत. त्यानुसार नावीन्यपूर्ण तांत्रिक साधने आणि उपकरणे विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली जातात. त्यामुळे ते रुग्णालयातील प्रत्यक्ष परिस्थितीला सामोरे जाण्यास सक्षम होतात. नर्सिंग क्षेत्रातील अद्ययावत अभ्यासक्रम आणि विविध तांत्रिक कौशल्ये आत्मसात करण्यासाठी महाविद्यालयात अत्याधुनिक प्रयोगशाळा, सुसज्ज लॅब्स आणि संगणक सुविधा आहेत.

सूर्यदत्ता कॉलेजचे प्राध्यापकवर्ग हे नर्सिंग आणि वैद्यकीय क्षेत्रात अनुभवी व कुशल आहेत. त्यांच्याकडून विद्यार्थ्यांना नर्सिंगच्या तांत्रिक बाबींचा सखोल अभ्यास करण्याची संधी मिळते. प्राध्यापक विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्रातील संशोधन, नावीन्यपूर्णता  आणि सर्जनशीलतेवर मार्गदर्शन करतात. यामुळे विद्यार्थ्यांना वैद्यकीय सेवा क्षेत्रात उत्तम तज्ज्ञ होण्यासाठी आवश्यक कौशल्ये मिळतात. सूर्यदत्ता कॉलेज ऑफ नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना विविध नामांकित रुग्णालयांमध्ये प्रत्यक्ष प्रात्यक्षिक अनुभव मिळतो. या रुग्णालयांमध्ये विद्यार्थ्यांना रुग्णांची काळजी कशी घ्यावी, उपचारांची योजना कशी करावी आणि रुग्णांची मानसिक तसेच शारीरिक स्थिती कशी हाताळावी हे शिकवले जाते.  अनुभवामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि ते व्यावसायिक जीवनात सक्षमपणे काम करू शकतात.

सूर्यदत्ता नर्सिंग कॉलेज विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासावरही लक्ष देते. महाविद्यालय विविध कार्यशाळा, सेमिनार्स आणि नेतृत्व विकास उपक्रम आयोजित करते. संवाद कौशल्य, निर्णयक्षमता आणि नेतृत्वाची क्षमता विकसित करण्यावर येथे विशेष भर दिला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांना नर्सिंग क्षेत्रात एक प्रभावी व्यावसायिक होण्याची संधी मिळते. सूर्यदत्ता कॉलेज ऑफ नर्सिंगमधून पदवीधर झालेल्या विद्यार्थ्यांना विविध नामांकित रुग्णालयांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध होतात. याशिवाय, महाविद्यालयाच्या प्लेसमेंट सेलद्वारे विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरही काम करण्याची संधी मिळते.

सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले की, नर्सिंग क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सूर्यदत्ता कॉलेज ऑफ नर्सिंग हे एक उत्तम ठिकाण आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आणि रुग्णसेवाचा वसा घेण्याची इच्छा असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याचे येथे स्वागत केले जाईल. आधुनिक काळात वैद्यकीय सेवेची व्याप्ती वेगाने बदल आहेत. त्यात नर्सिंग क्षेत्रही अपवाद नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्याप्रमाणे शिक्षण देण्याची सुविधा येथे केली आहे. महाराष्ट्रातील गरजू विद्यार्थिनींसाठी, ज्या मुली शिक्षण घेऊ शकल्या नाही अशा सर्व मुलींना शिक्षण मिळावे, शिक्षणाची संधी मिळावी अशा सर्व मुलींसाठी सूर्यदत्ता कॉलेजने सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे. सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटस्, सूर्यदत्ता नर्सिंग कॉलेज ऑफ नर्सिंग, पॅरामेडिकल सायन्सेस अँड टेकनॉलॉजी पुणे, बावधन, मुळशी तालुका, पुणे - ४११०२१ गरजू मुलींसाठी शिक्षणाचा सर्व खर्च सूर्यदत्तातर्फे केला जाईल परंतु राहण्याचा आणि खाण्याचा खर्च प्रत्यक्ष स्वतः करावा लागेल. प्रवेश प्रक्रियेची अंतिम मुदत १५ ऑक्टोबर आहे आणि अर्ज स्वीकारण्याची तारीख १० ऑक्टोबर असेल. कृपया याची नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी www.scnpst.org/ या संकेतस्थळावर, तसेच ७७७६०७२०००, ८९५६९३२४०० किंवा ८९५६३६०३६० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेच्या सहयोगी उपाध्यक्षा डॉ. किमया गांधी यांनी केले.
 


सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट - सुषमा चोरडिया
Total Views: 37