बातम्या
प्रदूषण करणाऱ्या घटकांवर कारवाई करा : डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार
By nisha patil - 1/25/2025 1:36:40 PM
Share This News:
पंचगंगा प्रदूषण नियंत्रणप्रश्री उच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीची बैठक घेण्यात आली. ग्रामीण भागातील प्रदूषणाबाबत तालुकास्तरावर मोहीम राबवा, अशा सूचनाही विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केल्या.
ज्या भागात प्रदूषणयुक्त घडामोडी घडत आहेत. त्या भागावर लक्ष ठेवुन प्रदूषण करणाऱ्या घटकांवर तत्काळ कारवाई करा, असे आदेश विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले. पंचगंगा प्रदूषण नियंत्रणप्रश्री उच्च न्यायालयाने नेमलेल्या देखरेख, समन्वय समितीच्या बैठकीत ते बोलत होते. ग्रामीण भागातील प्रदूषणाबाबत तालुकास्तरावर मोहीम राबवा, अशा सूचनाही केल्या. यावेळी कोणत्याही परिस्थितीत पंचगंगेत जलपर्णी येणार नाही, याची काळजी घ्या, असेही त्यांनी सांगितले. ग्रामपंचायत किंवा महापालिका प्रक्रिया न करता सांडपाणी सोडत असेल, तर कडक कारवाई करा.जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले,एसटीपीची कामे होऊ पाण्याचे नमुने घेऊन त्याचे पृथ्यकरण करा आयुक्त के मंजुलक्ष्मी यांनी एसटीपीबाबत तातडीने प्रक्रिया राबवून कामे सुरू केली जातील. असे सांगितले या बैठकीस जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. उपस्थित होते.
प्रदूषण करणाऱ्या घटकांवर कारवाई करा : डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार
|