विशेष बातम्या
फायनान्स कंपनीच्या वसुली गुंडांवर कठोर कारवाई करा
By nisha patil - 6/3/2025 7:21:22 PM
Share This News:
फायनान्स कंपनीच्या वसुली गुंडांवर कठोर कारवाई करा
मनसेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
सर्वसामान्य जनता जीवनाची अत्यंत निकडीची गरज भागवण्यासाठी खाजगी बँका फायनान्स कंपनी मायक्रो फायनान्स यांच्याकडून कर्जाची उचल करतात. मात्र हीच गरज ओळखून फायनान्स कंपन्या जनतेची दिवसेंदिवस लय लूट करीत आहेत. दिलेल्या कर्जापाई वसुलीसाठी गोरगरीब नागरिकांकडे फायनान्स कंपन्यांची गुंड तगादा लावत आहेत. आरबीआयच्या नियमांचे उल्लंघन करत कोल्हापुरात फायनान्स कंपन्यांच्या या वसुली बहाद्दरांनी सध्या हैदोस मांडला असून. नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास देण्याचे प्रमाण सुरू आहे.
याला आळा बसावा, संबंधितांवर पोलीस प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. यासह विविध मागण्यासाठी आज मनसेने कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं.
फायनान्स कंपनीच्या वसुली गुंडांवर कठोर कारवाई करा
|