बातम्या
टाकळी अकीवाट गायरानामधील पुरग्रस्ताना परिसरातील लोकांचा मदतीचा हात!
By nisha patil - 7/29/2024 10:55:52 PM
Share This News:
टाकळी अकीवाट गायरानामधील पुरग्रस्ताना परिसरातील लोकांचा मदतीचा हात!आज
बस्तवाड राजापूर खिद्रापूर राजापूर वाडी येथील पूरग्रस्तांच्या छावणीमध्ये जेवणाची वाटप करण्यात आले. येथील गायरानामध्ये स्थलांतरित झालेल्या पूरग्रस्तांसाठी व्हाईट आर्मी व परिसरातील दानशूर नागरिकांच्या वतीने जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती .गेली चार दिवसापासून हे पूरग्रस्त या ठिकाणी आपल्या जनावरासह राहिलेले आहेत. त्यानी सोबत आणलेली वैरण संपल्यामुळे चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला होता. हे लक्षात घेता आंदोलन अंकुश संघटनेकडून पूरग्रस्तांसाठी चारा वाटप करण्याची मागणी तहसीलदारसो शिरोळ हेळकरसाहेब, पशुसंवर्धन अधिकारी श्री देशमुख यांच्याकडे केली .
त्याप्रमाणे उद्यापासून सर्वच ठिकाणी चार्याचे वाटप होणार आहे .तसेचपुराचे गांभीर्य लक्षात घेता तात्काळ पूरग्रस्तांसाठी सानुग्रह अनुदान वाटपसुद्धा करावे अशी सुद्धा मागणी यावेळी करण्यात आली आहे .
प्रत्येक वेळी पूरच येऊ नये यासाठी शासकीय प्रयत्न होताना दिसत नाहीत आणि पूर आल्यानंतर मात्र पूरग्रस्तांना शासनाच्या मदतीकडे डोळे लावून बसावे लागतेअसे किती दिवस चालणार ?असा प्रश्न पूरग्रस्त नागरिकांच्यात उमटला.
यावेळी दीपक पाटील ,बंडू हाळीगळेसर बाळसिंग राजपूतसर निलेश तवंदकर, रशीद मुल्ला, सुदीप पाटील, संतोष आवटी,अमोल माने पांडू सिंग रजपूत, अभिजीत पाटील इत्यादी उपस्थित होते .
टाकळी अकीवाट गायरानामधील पुरग्रस्ताना परिसरातील लोकांचा मदतीचा हात!
|