बातम्या

तावडे हॉटेल महामार्गाच्या पुलाखाली पाणी आल्याने वाहतूक बंद...

Tavde hotel drive stop


By nisha patil - 7/28/2024 1:43:07 PM
Share This News:



कोल्हापूर: कोल्हापुरात पडणाऱ्या मुसळधार पावसाने सगळीकडेच दानादान झाली असून पुराचे पाणी पात्राबाहेर पडल्याने अनेक ठिकाणचे रस्ते बंद करण्यात आले आहेत. तावडे हॉटेल येथून कोल्हापूर शहरात जाणाऱ्या रस्तावर पुराचे पाणी आल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

तावडे हॉटेल महामार्गाच्या पुलाखाली पाणी असल्याने प्रशासनाने वाहतूक केली बंद केली.हा मार्ग बंद झाल्यामुळे शहरात जाण्यासाठी उजळाईवाडी (शाहू टोलनाका), सरनोबतवाडी मार्गे वाहतूक वळवण्यात आली आहे.


तावडे हॉटेल महामार्गाच्या पुलाखाली पाणी आल्याने वाहतूक बंद...