विशेष बातम्या
श्रमसंस्कार शिबिरातून सेवाभावाची शिकवण - महादेव कांबळे
By nisha patil - 6/2/2025 7:30:09 PM
Share This News:
श्रमसंस्कार शिबिरातून सेवाभावाची शिकवण - महादेव कांबळे
सैनिक गिरगाव, 6 फेब्रुवारी 2025: डी. वाय. पाटील अभियांत्रीकी महाविद्यालयाच्या एनएसएस विभागाने आयोजित ७ दिवसीय श्रमसंस्कार शिबिरामध्ये सेवाभाव आणि सामाजिक बांधिलकीची शिकवण देण्यात आली. सैनिक गिरगाव सरपंच महादेव कांबळे यांनी शिबिरात मार्गदर्शन करताना शिबिराद्वारे समाजसेवेचे महत्त्व आणि युवकांच्या विकासावर चर्चा केली.
शिबिरात योगासने, श्रमदान, आरोग्य शिबिर, वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम यांसारख्या विविध उपक्रमांचा समावेश होता. यावेळी विद्यमंदिर गिरगाव शाळेला दोन सीसीटीव्ही कॅमेरे भेट देण्यात आले, तसेच एनएसएस स्वयंसेवकांनी शाळेसाठी 200 हून अधिक पुस्तके भेट दिली.
श्रमसंस्कार शिबिरातून सेवाभावाची शिकवण - महादेव कांबळे
|