खेळ
टीम इंडिया न्यूझीलंड संघाशी भिडणार….
By nisha patil - 6/3/2025 2:17:31 PM
Share This News:
टीम इंडिया न्यूझीलंड संघाशी भिडणार….
चॅम्पियन ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात तब्बल 25 वर्षानंतर
रविवार 9 मार्चला चॅम्पियन ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पुन्हा एकदा टीम इंडिया न्यूझीलंड संघाशी भिडणार आहे. चॅम्पियन ट्रॉफीच्या फायनल मध्ये तब्बल 25 वर्षानंतर दोन्ही संघ आमने-सामने असणार आहेत.
आता रविवारी टीम इंडिया 25 वर्षांपूर्वीच्या पराभवाची परतफेड करणार की विजेती पदाला गवसणी घालणार का न्यूझीलंड पुन्हा एकदा विलन ठरणार याकडे भारतीय क्रिकेट प्रेमींचे लक्ष वेधले आहे. मागील २५ वर्षांपूर्वी न्युझीलँड क्रिकेट संघाने आयसीसीने आयोजित केलेली वन डे ट्रॉफी जिंकली नाही. न्युझीलँड संघ 2015 आणि 2019 च्या वनडे विश्व चषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला होता. परंतु दोन्ही वेळा पराभवाचा सामना करावा लागला पण आता पुन्हा एकदा रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाशी होणारा मुकाबला या संघासाठी मोठे आव्हानात्मक बनले आहे.
टीम इंडिया न्यूझीलंड संघाशी भिडणार….
|