ताज्या बातम्या
एस टी भाडेवाढ विरोधात ठाकरे सेना आक्रमक
By nisha patil - 1/28/2025 3:00:31 PM
Share This News:
राज्य सरकारने एसटीच्या तिकीट दरामध्ये नुकतीच 15 टक्के वाढ केलीय. या दरवाढीला आता सर्व स्तरातून विरोध होत आहे. शिवसेना ठाकरे गटाने राज्यभरात आंदोलनाची हाक पुकारलीय.आज कोल्हापूर शहरातील मध्यवर्ती बस स्थानक परिसरात दरवाढी विरोधात चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. एस. टी विभागात साधारण एक लाख कर्मचारी कार्यरत आहेत, परंतु एस. टी. महामंडळाचा गलथान व नियोजन शुन्य कारभार, भ्रष्टाचार, विविध मोफत प्रवास योजना व सध्या वाढलेल्या राजकिय हस्तक्षेपामूळे सर्वसामान्यांचा एस. टी चा प्रवास वर्षानुवर्ष महाग हात चाललाय.
सरकारने १५ टक्के भाडेवाढ करून ग्राहकांचा खिसा कापण्याचे काम केलय. सध्याचे विद्यमान सरकार एस. टी प्रशासन चालवत की संबंधीत विभागाचे मंत्री हा एक चेष्टेचा विषय बनला आहे.असा आरोप यावेळी आंदोलकांनी केलाय.
दरम्यान या आंदोलनामुळे बस स्थानक परिसरात काही काळ वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. परिणामी आंदोलन कर्त्यांना शाहूपुरी पोलिसांनी ताब्यात घेतलं.
या आंदोलना प्रसंगी विजय देवणे, राजू जाधव, , संजय पटकारे, विनोद खोत भरत आमते संतोष रेडेकर राजू यादव विराज पाटील स्मिता सावंत संतोष रेडेकर शशिकांत बिडकर अतुल परब सुहास डोंगरे शौनक भिडे , अवधूत साळोखे, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एस टी भाडेवाढ विरोधात ठाकरे सेना आक्रमक
|