बातम्या
ते निनावी पत्र खोडसाळपणातून व व्यक्तिगत द्वेषातून -योगेश गोडबोले
By nisha patil - 5/7/2024 2:26:10 PM
Share This News:
गोकुळच्या पशुसंवर्धन विभागामधील अधिकारी यांच्या कथित औषध खरेदीबाबतची माहिती एका निनावी पत्राच्या आधारे काही प्रसिद्धी माध्यमातून मिळाली आहे त्या बाबतचा खुलासा
कोल्हापूर ता.०४: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) संलग्न दूध उत्पादकांना अनेक सेवा-सुविधा देत आहे. त्यामध्ये गाय व म्हैशीसाठी पशुसंवर्धन विभागामार्फत औषधे, लसीकरण,जंत-निर्मूलन, कृत्रिम रेतन, वांझ शिबिरे, गोचिड निर्मुलन, वासरू संगोपन अनुदान अशा अनेक सेवा-सुविधा देत आहे. त्यामध्ये जनावरांची आजारावरील उपचार करिता संघामार्फत सभासदांना सवलतीच्या दरात औषधे दिली जातात. त्या औषधाची खरेदी एन.डी.डी.बी.च्या पद्धतीनुसार करण्यात येते. या औषध खरेदीसाठी पशुवैद्यकीय अधिकारी यांची कमिटी गठीत करण्यात आलेली असून या औषध खरेदीसाठी वर्तमान पत्रामध्ये टेंडर प्रसिद्ध करून औषध निर्माण करणाऱ्या कंपन्या व त्यांच्या वितरकाकडून होलसेल दर व त्यावर संघास मिळणारा डिस्काउंट या पद्धतीने दर पत्रके घेतली जातात व प्राप्त दर पत्रकामधून उच्च गुणवत्तेची औषधे कमिटीमध्ये सविस्तर चर्चा होऊन खरेदी केली जातात व तपासणी नंतर संघाच्या पशुसंवर्धन विभागाच्या स्टोअर मध्ये ठेवली जातात व पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार व दूध उत्पादकांच्या मागणीनुसार जनावरांना उपचार केले जातात. ही प्रक्रिया वर्षानुवर्षे संघ नियमानुसार अत्यंत पारदर्शीपणाने केली जाते.
सदर निनावी पत्रावर पाठवणाऱ्या कोणाचेही नाव अथवा संदर्भ नाही तसेच पत्रामध्ये लिहिलेल्या मजकुरामध्ये काहीही तथ्य नसून हे खोडसाळपणातून व व्यक्तिगत द्वेषातून तसेच गोकुळच्या बदनामीच्या विशिष्ट हेतूने पाठविण्यात आले आहे. त्यामुळे व्यक्तिगत स्वार्थासाठी ‘गोकुळ’ ब्रँड ची नाहक बदनामी करू नये. असा खुलासा गोकुळचे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांनी केला.
ते निनावी पत्र खोडसाळपणातून व व्यक्तिगत द्वेषातून -योगेश गोडबोले
|