शैक्षणिक
विवेकानंद कॉलेजमध्ये रंगले चौथे राष्ट्रीय आंतरमहाविद्यालयीन युवा साहित्य संमेलन
By nisha patil - 2/20/2025 6:23:41 PM
Share This News:
विवेकानंद कॉलेजमध्ये रंगले चौथे राष्ट्रीय आंतरमहाविद्यालयीन युवा साहित्य संमेलन
कोल्हापूर, २० फेब्रुवारी २०२५ – नव्या पिढीच्या साहित्यिक सृजनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी विवेकानंद कॉलेजमध्ये चौथे राष्ट्रीय आंतरमहाविद्यालयीन युवा साहित्य संमेलन पार पडले. मातृभाषेतून विचारांची मुक्त अभिव्यक्ती व वाचन-लेखनाच्या महत्त्वावर भर देत, लेखक व शिक्षणतज्ज्ञ डॉ. बी.एम. हिर्डेकर यांनी युवांमध्ये साहित्यप्रेम आणि सर्जनशीलतेला वाव मिळावा या दृष्टीने प्रेरणादायी भाषणे केली. अध्यक्ष म्हणून प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी मराठी साहित्याच्या समृद्ध परंपरेवर प्रकाश टाकला. कार्यक्रमात नवनाथ गोरे यांची प्रकट मुलाखत, युवा कविंनी सादर केलेल्या कवितांचे सत्र, सांस्कृतिक कार्यक्रम व ग्रंथ प्रदर्शन यांचा समावेश होता.
विवेकानंद कॉलेजमध्ये रंगले चौथे राष्ट्रीय आंतरमहाविद्यालयीन युवा साहित्य संमेलन
|