बातम्या

कोरटकरबाबत मुख्यमंत्र्यांना जाब विचारणारच..आंदोलनकर्ते निर्णयावर ठाम.

The Chief Minister will be asked


By nisha patil - 5/3/2025 3:39:37 PM
Share This News:



कोरटकरबाबत मुख्यमंत्र्यांना जाब विचारणारच..आंदोलनकर्ते निर्णयावर ठाम.

इंडिया आघाडी शिवप्रेमींनी जुना राजवाडा पोलिसांना सांगितलं.

इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी व छत्रपती शिवाजी महाराज, छ.संभाजी महाराजांविषयी उपशब्द वापरल्या प्रकरणी प्रशांत कोरटकरवर कारवाई झाली नाही.त्यांना अटक न झाल्याने उद्या ६ जानेवारीला कोल्हापुरात इंडिया आघाडी व शिवप्रेमी संघटनांनी मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवण्याचा निर्णय घेतलाय.

या पार्श्वभूमीवर आंदोलन  इंडिया आघाडी व शिवप्रेमी संघटनांना जुना राजवाडा पोलीस स्टेशन मध्ये बैठकीसाठी बोलवण्यात आले होते. या बैठकीत पोलीस निरीक्षक झाडे यांनी आंदोलन करू नका,न्यायालयाने त्यांना अकरा तारखेपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केलाय व आम्ही तपास करतच आहे त्यामुळे तुम्ही पुकारलेले आंदोलन हे स्थगित करावे अशी विनंती केली. 

पण आंदोलकांनी आपल्या निर्णयावर ठाम राहत " आम्ही मुख्यमंत्र्यांना जाब विचारणार आणि त्या आंदोलनावर ठाम आहोत अशी भूमिका घेतलीय.


कोरटकरबाबत मुख्यमंत्र्यांना जाब विचारणारच..आंदोलनकर्ते निर्णयावर ठाम.
Total Views: 24