शैक्षणिक
विवेकानंद कॉलेजमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न
By nisha patil - 2/28/2025 5:12:48 PM
Share This News:
युवकांनी खेळ आवड म्हणून जोपासावा – दीनानाथ सिंह
कोल्हापूर (दि. 28) : विवेकानंद कॉलेजमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला. प्रमुख पाहुणे रुस्तम-ए-हिंद पैलवान मा. दीनानाथ सिंह यांनी विद्यार्थ्यांना खेळाकडे व्यावसायिक दृष्टिकोनाने न पाहता आवड म्हणून जोपासण्याचा सल्ला दिला.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या पंचसूत्रीचा अवलंब करून संस्थेचा नावलौकिक वाढवावा, असे आवाहन केले.
समारंभात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. आदर्श विद्यार्थी म्हणून प्रविण जामखंडे, समृध्दी माने, गायत्री लोळगे, सुयश झुणके, प्रज्योत गायकवाड, समिधा घुगरे यांना ‘शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे गुणवत्ता शिष्यवृत्ती’ प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुप्रिया पाटील यांनी केले.
विवेकानंद कॉलेजमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न
|