राजकीय
तुमच्या मनातून अजूनही खुर्ची जात नाही..
By nisha patil - 11/3/2025 3:21:08 PM
Share This News:
तुमच्या मनातून अजूनही खुर्ची जात नाही..
अजित पवारांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना टोला..
अर्थसंकल्पावर चर्चा, मंचावर तिघांचा सावरासावरचा माहौल
राज्याचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्रितपणे माध्यमांसमोर भूमिका मांडली. चर्चा सुरू असताना एकनाथ शिंदे यांनी म्हटलं, "मागील वेळी देखील आम्ही तिघे होतो, फक्त खुर्च्यांची अदलाबदल झालीय." यावर अजित पवार यांनी मिश्किल अंदाजात फडणवीस यांना डोळा मारत शिंदेंना टोला लगावला, "तुमच्या मनातून अजूनही खुर्ची जात नाही." यावर सर्वांनी हशा केला. फडणवीस यांनीही मिश्किल टिपणी करत वातावरण हलकंफुलकं केलं.
तुमच्या मनातून अजूनही खुर्ची जात नाही..
|